नागपूर शहर: सदर पोलिसांची मोठी कारवाई; गड्डीगोदाम परिसरातून १० गोवंशांची सुटका: अमोल देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी 26 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम परिसरातील लाल शाळा जवळ कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे लपवून ठेवलेल्या १० गोवंशांची पोलिसांनी सुटका केली आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली आहे.