भद्रावती तालुक्यातील तांडा येथील घमाबाई आश्रम शाळेत पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत गैर आदिवासी प्राथमीक विभागात येथील फेरीलैंड शाळेने व्दितीय क्रमांक पटकाविला.शाळेचे शिक्षक सबीया बगडे,किर्ती कळमकर व प्राजक्ता हातझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली असीम शेख,प्रिया पाल व संस्कार पेटकर या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिकृती सादर केली होती.यश मिळविल्याबद्दल शाळेतर्फे सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.