तुमसर: शहरातील भाजप कार्यालयात माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली
तुमसर शहरातील भाजप कार्यालयात आज दि. 8 नोव्हेंबर रोज शनिवारला दुपारी 3 वा. भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचे उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी होऊ घातलेल्या न.प.निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन डॉ. फुके यांनी केले तर नगरपरिषदेमध्ये भाजपची सत्ता येणार असे मत व्यक्त केले.