हिंगणघाट: शेतकरी कर्जमाफीसाठी मांडगाव येथे चक्का जाम आंदोलन: आंदोलनात प्रहारच्या कार्यकर्ते सहभागी
शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यासाठी राज्यभर होत असलेल्या आंदोलनचे पडसाद मांडगाव येथेही उमटले मांडगाव येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.मांडगाव येथील बस स्टॅण्ड चौकात शेतकरी एकत्र आले व अमरावती उमरेड राज्य महामार्ग रोखून घरला यावेळी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची राज्यकर्त्यांना आठवण नाही का असा प्रश्न विचारण्यात आला राज्यातील शेतकरी हवालदील झाला असताना कृषिमंत्र्यांना रमी खेळायला वेळ मिळतो तरी कसा हाही प्रश्न विचारण्यात आला या आंदोलनात मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते सहभागी.