हिंगणघाट: उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक द्या: राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्ष आक्रमक: आंदोलनाचा ईशारा
हिंगणघाट शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे गेल्या दोन वर्षापासून वैद्यकीय अधिक्षकांची जागा रिक्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी मार्फत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले यामध्ये रुग्णालयील विविध समस्या दूर करण्याची मागणी केली असून सर्व मुद्यांवर शासनाने गांभीर्याने लक्ष घालून आठ दिवसात प्रश्न मार्गी लावावा. आणि जनतेला न्याय द्यावा अन्यथा आनंदोलन करु असा इशारा देण्यात आला आहे