लातूर: लातूरमध्ये उन्हातच बरसला पाऊस; राम गल्लीतील चिमुकलीने अनुभवला निसर्गाचा आनंद
Latur, Latur | Nov 1, 2025 आज शनिवार १ नोव्हेंबर रोजी दुपारी नेमके ३ वाजून ४३ मिनिटांनी लातूर शहराने अनोखा नजारा पाहिला. कडक उन्हाच्या तापात अचानक ढग दाटून आले आणि काही क्षणातच पावसाच्या सरी बरसल्या. निसर्गाच्या या अनोख्या संगमाने उन्हाची उष्णता आणि पावसाची थंडावा शहरवासीयांना क्षणभर थांबवून दिला.