अलिबाग: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील मतदार पडताळणीला वेग
Alibag, Raigad | May 21, 2026 भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमे अंतर्गत रायगड जिल्ह्यात मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदारांची पडताळणी आणि मॅपिंगचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्ह्यात एकूण २ हजार ७९० मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर एक बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) नियुक्त करण्यात आला आहे.