ठाणे: कॅन्सर ग्रस्त व्यक्तीला आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारामुळे मिळाला दिलासा
Thane, Thane | Oct 22, 2025 पारसिक नगर येथील संजय विठ्ठल गावडे हे कॅन्सर आजाराने पीडित आहेत. मात्र त्यांच्या वडिलांनी 1996साली गाडी घेतली होती आणि ती गाडी अनेक वर्षानंतरही त्यांच्याच नावावर असल्याची नोंद आरटीओ कार्यालयात दाखल होती त्यामुळे त्यांना रेशनचे धान्य आणि सरकारी औषध उपचारात सर्व सवलती बंद झाल्या होत्या. त्यानंतर गावडे यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे मदतीचा हात केला आणि तात्काळ आरटीओ कार्यालयाशी पत्र व्यवहार करून आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारामुळे ती नोंद रद्द करण्यात आली. त्यामुळे गावडेनी आभार मानले