ठाणे: खेवरा सर्कल येथे इमारतीच्या कंपाउंड वरून आत शिरून श्वानावर बिबट्याचा हल्ला, सीसीटीव्हीमुळे परिसरात खळबळ
Thane, Thane | Sep 17, 2025 मागील काही दिवसांपासून बिबट्या शिकारीच्या शोधामध्ये मानवी वस्तीत येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज मध्यरात्री मानपाडा परिसराच्या केवडा सर्कल येथे इमारतीच्या कंपाउंड वरून आत मध्ये उडी मारून श्वानावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये श्वान गंभीर जखमी झाले आहे. दुसऱ्या शहनाने आरडा ओरड केल्यानंतर तेथून बिबट्या पसार झाला मात्र सीसीटीव्ही मध्ये बिबट्याने केलेला हल्ला कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.