नागपूर शहर: गुन्हे शाखेकडून वाहन चोरीचा गुन्हा उघड; विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात, केटीएम दुचाकी जप्त
13 मे ला रात्री 7:30 ला मिळालेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली महागडी मोटारसायकल शोधण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीची के.टी.एम. दुचाकी जप्त केली आहे.चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या दोन साथीदारांसह ही चोरी केल्याची कबुली दिली. जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपीला पुढील कारवाईसाठी अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.