कागल: कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लिंगनूर दुमाला येथे बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मंगळवारी सकाळी 10 वाजता लिंगनूर दुमाला ता.कागल येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला."मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, यासाठी मतदारांनी घरातून बाहेर पडून मतदान करावं," असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं.मुश्रीफ पुढे म्हणाले मतदारांचा सकाळ पासून उत्साह पाहून कागल तालुक्यात सर्वात जास्त मतदान होईल तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.