नागपूर शहर: इलेक्ट्रिक स्कूटर देण्याच्या बहाण्याने २२ ग्राहकांची फसवणूक : चेतनसिंह चौहान वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चौहान यांनी 18 एप्रिलला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून २२ ग्राहकांकडून ६ लाख ५५ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बजाज नगर पोलिसांनी गणेश पंजवानी आणि अनिल वलीच्छा या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चौहान यांनी दिली आहे.