नागपूर शहर: पावसाचा फटका: कळमना मार्केट जलमय; व्यापारी आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली
काल पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाणी साचले असून, व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले असून, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.