नागपूर शहर: बेलतरोडी परिसरात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रस्त्याशेजारील साईन बोर्डला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिंचभवन येथील आयोध्या ह्युंदाई शोरूमसमोर घडली. सुनील हरीभाऊ गवई (वय ५० वर्षे), रामदास प्रल्हाद जुमनाके (वय ५५ वर्षे) आणि दिलीप भाऊराव सांभारे (वय ६३ वर्षे) हे तिघे कारनेजात होते.