लातूर: लातूरात मुसळधार पाऊस, लातूरच्या जिल्हापरिषदेपुढे पावसाचे झाले तळे; गाड्या अडकल्या,भाज्या गेल्या वाहून, नागरिक त्रस्त
Latur, Latur | Sep 16, 2025 लातूर -सोमवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने लातूर शहरातील अनेक भाग जलमय झाले. विशेषतः जिल्हा परिषद कार्यालयासमोर तर थेट तळ्यासारखे चित्र निर्माण झाले. त्या भागात तासभर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.या पाण्यात अनेक दुचाकी, चारचाकी गाड्या अडकून पडल्या. वाहनधारकांना आपल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी चाचपडावे लागले. यामुळे जिल्हा परिषदेपुढील संपूर्ण रस्ता ठप्प झाला आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. असल्याचे आज सायंकाळी पाच वाजता पाहायला मिळाले.