नागपूर शहर: नागपुरात धर्मांतरासाठी छळ; पतीवर गुन्हा दाखल: गजानन तमाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
शांती नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तमाटे यांनी 3 जुलै ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या नरेंद्र नगरमधील ४५ वर्षीय महिलेने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर १० वर्षांनी पती जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव आणत असून, छळ करत असल्याचे महिलेने म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून महिलेने शांतिनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तमाटे.