नागपूर शहर: शेतकऱ्यांच्या पाठीशी न उभे राहणाऱ्या बँकांवर होणार कारवाई: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात असताना, त्यांना सहकार्य करणे ही बँकांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, काही बँका शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी न उभे राहणाऱ्या बँकांवर आणि संबंधित अधिकारी वर्गावर कठोर कारवाई केली जाईल, असा दम बावनकुळे यांनी दिला आहे.