कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता नाशिक जिल्ह्यातही उमटले असून, आज सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. या आंदोलनातून शिवरायांच्या अपमानाचा तीव्र शब्दांत निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. केवळ ही घटना नव्हे, तर बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचाही यावेळी निषेध व्यक्त करण्यात येणार आहे