अमरावती शहराच्या पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने 'माझी वसुंधरा अभियान ६.०' अंतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अमरावतीचा अधिकृत 'शहराचा पक्षी' (सिटी बर्ड) निवडण्याची प्रक्रिया आज १८ नोव्हेंबर पासून सुरू झाली असून, अमरावतीकरांना ऑनलाईन मतदानाद्वारे आपल्या पसंतीच्या पक्ष्याची निवड करण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक (IAS) यांनी केले आहे.