करवीर: 19 आणि 20 सप्टेंबर रोजी सायबर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन; 100 हून अधिक संशोधन पेपर होणार सहभागी
कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयातील आनंद भवन या ठिकाणी 19 व 20 सप्टेंबर रोजी भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन तंत्रज्ञान सामाजिक परिणाम आणि पर्यावरण जबाबदारी या विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषद पार पडणार आहे. यासाठी विविध देशातून शंभरहून अधिक संशोधन पेपर सहभागी होणार आहेत. अशी माहिती सायबर च्या प्रभारी संचालिका डॉक्टर बिंदू मेनन आणि दिन एम के माने यांनी कोल्हापूर प्रेस क्लब इथं पत्रकार परिषदेत दिली आहे.