निम्न तेरणा प्रकल्प माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाढलेली पाण्याची आवक लक्षात घेऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज बुधवार, दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ठीक 10.०० वाजता धरणाची एकूण २ वक्रद्वारे प्रत्येकी १० सें.मी. ने उघडण्यात आली आहेत. या माध्यमातून एकूण ७६७ क्यूसेक्स (२१.७१ क्यूमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग तेरणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.