नागपूर शहर: उर्स मिरवणुकीत नोटा उडवल्याप्रकरणी नगरसेवक वसीम खान सह सहा जणांवर गुन्हा दाखल : संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 16 जुलैला दुपारी 3:30 वाजता दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या सेवा सदन चौकात हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या १०४ व्या उर्स दरम्यान काढलेल्या संदल मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी नगरसेवक वसीम खानसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.