दिवाळी म्हणजे स्नेह, सद्भावना आणि प्रेमाचा उत्सव. हा सण समाजात चैतन्यमय एकोपा निर्माण करणारा असून, परंपरा आणि श्रद्धेचा संगम आहे. याच भावनांना अनुसरून आज बाभळगाव येथील निवासस्थानी लातूर शहर विधानसभेचे आमदार श्री. अमित देशमुख यांनी कुटुंबीयांसमवेत पारंपरिक पद्धतीने विधीवत लक्ष्मीपूजन केले.