औंढा नागनाथ: सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा;महामहीम राष्ट्रपती यांना औंढा नागनाथ तहसीलदार मार्फत निवेदन
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना दलित आघाडी जिल्हा हिंगोली च्या वतीने दिनांक ९ ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता महामहीम राष्ट्रपती यांना औंढा नागनाथ येथील तहसीलदार हरीश गाडे यांच्यामार्फत देण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमेध मुळे, प्रदीप कनकुटे, विक्रम बनसोडे, राधिका चिंचोलीकर विलास मंडलिक यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती