नागपूर शहर: नागपुरात अल्पवयीन वाहन चोर गजाआड, पाचपावली पोलिसांची कार्यवाही
16 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पेट्रोलिंग दरम्यान वाहन चोरी करणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी किंमत 75 हजार रुपये जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत घडलेले ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. ताजनगर टेका परिसरातून सकलेन खान यांची होंडा ॲक्टिव्हा चोरीला गेली होती. याप्रकरणी पाचपावली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असताना, पोलिसांनी संशयास्