नागपूर शहर: खाकीचा धाक संपला? सराईत टोळीकडून पोलिसांना खुले आव्हान, चोरट्यांची सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल
इतवारी किराणा बाजारात गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. निर्भय चोरांनी एकापाठोपाठ एक अशा ८ हून अधिक दुकानांना आपले लक्ष्य केले आहे. चोरांनी कुलपे तोडून लाखो रुपयांचा माल आणि रोकड लंपास केली आहे. या घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाल्या आहेत. चोरांचे धाडस इतके वाढले आहे की त्यांना कायद्याची कोणतीही भीती उरलेली नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.