दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात एका पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या भयंकर बॉम्बस्फोटात अनेक निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या आणि इतर नागरिक जखमी झाल्याच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी सायंकाळी ५ ते ७ वाजता दरम्यान तुमसर शहरात एक विराट मौन कँडल रॅली आयोजित करण्यात आली होती. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (नेहरू शाळेजवळ) येथून सुरू झाली आणि हुतात्मा स्मारक (पोलीस स