नागपूर शहर: नागपूरच्या माजी महापौर डॉ. माया इवनाते यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ; मराठीतून केला नामोल्लेख
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आलेल्या नागपूरच्या माजी महापौर डॉ. माया चिंतामण इवनाते यांनी आज संसदेत आपल्या पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे, त्यांनी आपली शपथ मराठी भाषेतून घेत मातृभाषेचा सन्मान राखला.राज्यसभेचे सभापती श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. डॉ. इवनाते यांनी 'ईश्वर साक्ष' शपथ घेताना भारतीय संविधानाप्रती निष्ठा आणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखण्याची ग्वाही दिली.