सातारा: महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात आता मिळणार युवकांना कौशल्य प्रशिक्षण; मंत्री शंभूराज देसाई यांचा विशेष पुढाकार
Satara, Satara | Sep 16, 2025 महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर सोमवारी सायंकाळी सात वाजता विशेष बैठक झाली. त्यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील युवक-युवतींना पर्यटन क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी १५ हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचा विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला असून, कौशल्य विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.