नागपूर शहर: फॉर्च्युन मॉलमध्ये लिफ्ट अडकली; काच फोडून नागरिकांची सुटका
शहरातील सीताबर्डी परिसरातील फॉर्च्युन मॉल मध्ये शुक्रवारी संध्याकाळी लिफ्ट बंद पडल्याची खळबळजनक घटना घडली. या लिफ्टमध्ये ५ ते ६ नागरिक तब्बल **२० ते २५ मिनिटे** अडकून पडले होते.संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी लिफ्ट अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. आत असलेल्या नागरिकांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. बंदिस्त जागेमुळे काही जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तर काहींना चक्कर येऊ लागली. यामुळे मॉलमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.