ठाणे: हिरानंदानी इस्टेट येथे इमारतीच्या 31 व्या मजल्यावर लागली भीषण आग
Thane, Thane | Oct 21, 2025 ठाणे शहराच्या घोडबंदर रोड परिसरातील हिरानंदानी इस्टेट येथे बॅसिलियस इमारतीच्या 31 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना रात्री उशिरा घडली होती. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी,अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु इमारतीत अचानक आग लागल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.तसेच आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती मिळत आहे. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही