खालापूर: खोपोली येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
आज गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत खोपोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष संघटनाची मजबुती तसेच, विविध महत्त्वाच्या विषयांवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.