नागपूर शहर: व्हर्च्युअल ईद' साजरी केल्यास बकरे पाळणाऱ्या हिंदू बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान: अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान
जर 'व्हर्च्युअल ईद' साजरी केली, तर वर्षभर बकरे पाळणाऱ्या हिंदू समाजातील लोकांचे काय? असा महत्त्वपूर्ण प्रश्न राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी उपस्थित केला आहे. हिंदू समाजातील खाटिक आणि पशुपालक बांधव मोठ्या प्रमाणात बकरे पालन करत असतात. त्यामुळे व्हर्च्युअल ईद साजरी केल्यास त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.