नागपूर शहर: बेलतरोडी हद्दीत घातक शस्त्रासह धुमाकूळ घालणारा आरोपी अटकेत
17 मे ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचभवन येथील क्राऊन को-ऑपरेटिव्ह सोसायटीसमोर घातक शस्त्रासह धुमाकूळ घालणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.राजेश बुधराम मरकाम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २०० रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त केला आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने चाकू बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.