नागपूर शहर: थरारक! अवघ्या 24 तासात 3 खून,नागपुरात दुहेरी हत्याकांडाने खळबळ: सक्करदरा परिसरात दोघांची निर्घृण हत्या
उपराजधानीत गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक रितीने वाढत असून, जून महिन्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले आहे. बुधवारी रात्री सक्करदरा परिसरात दोन तरुणांची सुऱ्याने वार करून आणि दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचे काहीही थरारक विडिओ देखील समोर आले आहे.अवघ्या 24 तासात घडलेली ही तिसरी खुनाची घटना आहे.