समुद्रपूर: पारडी घाटावर अवैध वाळूचे उत्खनन करणाऱ्या एक ट्रॅक्टर व एक जेसीबीसह ३७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
पारडी घाटावर अवैध वाळूचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या एक ट्रॅक्टर व एक जेसीबीसह ३७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कल्याण शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार वर्धा येथील कल्याण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने पारडी घाटावर धाड टाकून याठिकाणी पाहणी केली असता याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने एक ट्रॅक्टर वाळू भरताना आढळून आले.यावेळी पथकाने एक ट्रॅक्टर व एक जेसीबी वाळू असा एकूण ३७ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.