अक्कलकुवा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा स्वबळावरच लढणार : आमदार डॉ विजयकुमार गावित
जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका या भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात कामगिरी केली असल्यामुळे पक्षश्रेष्ठींना या संदर्भात माहिती देत जिल्हा परिषद निवडणुका या भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती आज शुक्रवारी अक्कलकुवा येथे पक्ष मेळाव्यात दुपारी आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिली.