नागपूर शहर: नागपुरात डॉक्टरची लाखोंची फसवणूक; गुंतवणुकीच्या नावाखाली घातला गंडा: अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूर यांनी तीन मेला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एका नामांकित डॉक्टरची तब्बल २९ लाख ७७ हजार ७४७ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हुडकेश्वर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली आहे.