नागपूर शहर: एकनाथ सावजी भोजनालय बिल्डिंगच्या पहिल्या माळ्यावर जुगार खेळणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
20 एप्रिलला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीतील एकनाथ सावजी भोजनालय बिल्डिंगच्या पहिल्या माळ्यावर सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून रोख रक्कम सहा हजार तीनशे रुपये व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.