नागपूर शहर: नागपूर पोलिसांचे 'ऑपरेशन थंडर': ३४ किलो गांजासह ६ आरोपींना अटक: गजानन गुल्हाने पोलीस निरीक्षक
एनडीपीएस पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी 15 मे ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहराचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या 'ऑपरेशन थंडर' या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली आहे.