नागपूर शहर: नंदनवन पोलिसांची धडाकेबाज कारवाई: ग्राहकाच्या वेषात दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक : कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 23 जूनला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नंदनवन पोलिसांनी आभूषण चोरीच्या आरोपाखाली एका महिलेला अटक केली आहे. ही महिला अतिशय शिताफीने चोरीच्या घटनांना अंजाम देत होती.आरोपी महिला ग्राहक बनून विविध दुकानांमध्ये जात असे. दुकानात गर्दीचा किंवा दुकानदार व्यस्त असल्याचा फायदा घेऊन ती मौल्यवान दागिने चोरत असे. याबद्दलचे अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.