हवेली: सोरतापवाडी स्कुल बसच्या अपघातात तीन नव्हे तर चार वाहनांचा समावेश, माहिती आली समोर
Haveli, Pune | Oct 9, 2025 पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत स्कुल बस व गज वाहतूक करणारा पिकअप, हायवा डंपर व एक दुचाकी असा चार वाहनांचा अपघात झाला आहे. उरुळी कांचन बाजूकडे जाताना देवकर पेट्रोल पंप परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातात पेठ (ता. हवेली) येथील दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.