मानगाव: मतदार याद्या मिळत नाहीत या महाविकास आघाडीच्या आरोपाचा सुनील तटकरे यांनी घेतला समाचार
Mangaon, Raigad | Oct 17, 2025 मतदार याद्या मिळत नाहीत या महाविकास आघाडीच्या आरोपाचा खासदार सुनील तटकरे यांनी समाचार घेतलाय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले आणि महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्या पराभवातून न सावरलेले सर्वजण अशा वेगवेगळ्या चर्चा करीत असतात.अशी खिल्ली तटकरे यांनी उडवली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदार याद्या जाहीर केल्या जातात हे यांना माहीत नाही का सूचना हरकती मागावताना याद्या मिळतात हे सांगताना यादी मिळत नाही म्हणजे काय असा सवाल तटकरे यांनी केला