नागपूर शहर: दहेगाव रंगारीत थरार! उधारीचे पैसे मागितल्याने पानटपरी चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला; आरोपी गजाआड
[
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दहेगाव रंगारी येथे एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जुन्या उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका पानटपरी चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्याची ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.