निफाड: लासलगाव च्या दिशा मोरे ने वर्ल्ड पावर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले,
Niphad, Nashik | Dec 1, 2025 लासलगावच्या ग्रामीण भागातील दिशा मोरे हिने श्रीलंकेत पार पडलेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेस व डेडलिफ्ट चॅम्पियनशिप २०२५ मध्ये सुवर्णपदक पटकावून देशाचा मान उंचावला आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या दिशाने जिद्द, सराव आणि वडिलांच्या कष्टाच्या पाठबळावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे यश मिळवले आहे. तिच्या या कामगिरीमुळे लासलगाव-पिंपळगाव (नजिक)सह संपूर्ण परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामीण भागातील तरुण मुलींसाठी ती प्रेरणास्त्रोत ठरत आहे. स्वप्न पाहायची जिद्द असली की परिस्थिती अडथळा ठरत न