सातारा: नागपूरचे राजे श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांची घेतली भेट; केली सविस्तर चर्चा
Satara, Satara | Oct 18, 2025 नागपूर येथील राजे श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी सातारा दौऱ्यामध्ये शनिवारी दुपारी दीड वाजता पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सातारा येथील कोयना दौलत निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. मूळचे देऊर, ता. कोरेगाव येथील असलेले नागपूर संस्थानचे अधिपती श्रीमंत मुधोजीराजे भोसले हे सामाजिक कार्यामध्ये नेहमी पुढे असतात. नागपूर येथे वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते भाग घेतात.