रावेर: रेल्वे स्टेशन परिसरातील सोमेश्वर नगरात गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले, रावेर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 30, 2025 रावेर शहरात रेल्वे स्टेशन परिसर आहे.या भागात सोमेश्वर नगर आहे. येथे वाहन क्रमांक एम.एच.२० बी.टी.३३७२ द्वारे अफरोज खान हा तरुण अवैधरित्या दोन गोवंश वाहतूक करत होता. पोलिसांनी त्याला पकडले त्याच्याकडून वाहन, गोवंश एकूण २ लाख १९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेव्हा या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.