रूपाली चाकणकर विरोधात ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आक्रमक.
आज दिनांक 24 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निषेध मोर्चा वरळी येथे काढण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली असून न्याय मागण्यासाठी आलेल्या लोकांना चिल्लर थिल्लर म्हणणं चुकीचं असून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा असे पेडणेकर म्हणाल्या.