जालना: परभणीतील तिघांनी जालन्यातून डुकरांची चोरी केल्याचा आरोप; दोन डुकरांसह एक जेरबंद; मौजपुरी पोलीसात गुन्हा दखल
Jalna, Jalna | Jul 11, 2026 जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना परिसरातून डुकरांची चोरी केल्याप्रकरणी परभणी येथील तिघांविरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका संशयिताला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले असून त्याच्याकडून चोरीची दोन डुकरे, एक बकरी, दोन बकरीची पिल्ले तसेच कार जप्त करण्यात आली आहे. उर्वरित दोघेजण घटनास्थळावरून पसार झाले. शनिवार दि. 11 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी लहु गुणाजी पवार रा. रामनगर, साखर कारखाना, जालना यांनी फिर्याद दिली.