मोर्शी: मध्यप्रदेश सीमेवरून महाराष्ट्रात गावठी दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीवर मोर्शी पोलिसांची धाड. मूद्देमालजप्त करून आरोपीला अटक
आज दिनांक 13 नोव्हेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिनांक 12 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता पासून राबविलेल्या मोहिमे अंतर्गत मध्यप्रदेश सीमेवरून महाराष्ट्रात गावठी हातभट्टी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या सुखदेव लालमन ईवने, भोला भिमराव ऊईके, जानराव भीमराव ऊईके, या तिघांना रोहना येथून मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तिघेही दुचाकीवरून हातभट्टीची दारू मध्यप्रदेश सीमेवरून महाराष्ट्रात वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे